Home बातम्या ऐतिहासिक ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान

0
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान

मुंबई, दि.२८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘मराठी भाषा आणि मराठीच्या बोली’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. १ मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा भाग म्हणून दिलखुलास कार्यक्रमात डॉ. कार्व्हालो यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं