Home बातम्या ऐतिहासिक राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री शंभूराज देसाई

राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री शंभूराज देसाई

0
राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ९ : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सर्व घटक, सर्व विभागांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प असून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृत ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प राज्याला सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर करेल.

०००

शैलजा पाटील/विसंअ/