१० किलो बिबे फोडल्यानंतर मिळते केवळ १ किलो गोडंबी

- Advertisement -

मालेगाव : तालुक्यातील सुमारे २५ गावांमध्ये आदिवासी समाजातील शेकडो महिला बिबे फोडण्याचे काम करतात. कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी आरोग्याची कुठलीही तमा न बाळगता बाळगता निरंतर ८ ते १० तास बिबे फोडल्यानंतर त्यातून केवळ १ किलो गोडंबी तयार होते. किलोप्रमाणे ठेकेदाराकडून मिळणारी मजूरी मात्र तुटपुंज्या स्वरूपातील असल्याने संबंधित महिला त्रस्त झाल्या आहेत.
मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल गावांमध्ये रोजगाराची ठोस साधने नाहीत. शेतमजूरीच्या भरोशावर कुटूंबाचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यामुळे विशेषत: महिलांकडून बिबे फोडून त्यातून गोडंबी काढून देण्याचे काम केले जाते. सदर गोडंबी किलोप्रमाणे मोजून घेणाऱ्या ठेकेदारांकडून मात्र मिळणारी मजूरी फारच अल्प प्रमाणात आहे. बिब्यांमधून गोडंबी काढण्याच्या कठीण कामामुळे अनेक महिलांना श्वसनाचे विकार, त्वचा विकार, डोळ्यांचे आजार उद्भवले आहेत.

शासनाकडे पत्रव्यवहार 
सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांनी आदिवासी महिलांच्या समस्येबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांच्या उपस्थितीत १० आॅगस्टला मालेगाव येथे बिबे फोडून गोडंबी काढण्याचे काम करणाºया महिलांचा मेळावा घेण्यात आला. त्यात महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याविषयी चर्चा झाली.

- Advertisement -