Home ताज्या बातम्या अचलपूरची ‘फिन्ले मिल्स’ सुरू करण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

अचलपूरची ‘फिन्ले मिल्स’ सुरू करण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

0
अचलपूरची ‘फिन्ले मिल्स’ सुरू करण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

मुंबई, दि. 5 : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिन्ले मिल्स हा ग्रामीण भागातील उद्योग असून अनेक कामगार येथे काम करत होते. कोविड काळातील अडचणीमुळे मील बंद झाल्याने अनेकांच्या रोजगारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही मिल सुरू करणे आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्याशी चर्चा करून राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिन्ले मिल्स सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार ओमप्रकाश (बच्चू) कडू, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्रसिंग, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे (नवी दिल्ली) अध्यक्ष व सरव्यवस्थापकीय संचालक आशुतोष गुप्ता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मिल सुरू होईपर्यंत कामगाराना अर्धवेतन देण्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/