Home बातम्या ऐतिहासिक राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी – महासंवाद

राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी – महासंवाद

0
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी – महासंवाद

नवी दिल्लीदि. 14 : महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती आज  महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रात उत्साहात साजरी करण्यात आली.

 कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र  सदनाच्या  अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र सदनातील अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

             महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री विजय कपाटे  यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासह  परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर, अधीक्षक रघुनाथ सोनवणे, किशोर वानखेडे, प्रशांत शिवरामे या कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

            सकाळी संसद भवन परीसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत   उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, यांच्यासह केंद्रीय मंत्री,  खासदार सर्वश्री, सोन‍ीया गांधी,  मल्लिकार्जून खरगे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचे अुनयायी मोठया संख्येने उपस्थित होते.