Home ताज्या बातम्या सांगली कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 50 लाखांचा निधी देणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची कोल्हापुरात घोषणा

सांगली कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 50 लाखांचा निधी देणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची कोल्हापुरात घोषणा

0

बोरघर / माणगांव : मुंबई: सांगली आणि कोल्हापुरात महाजलप्रलयाने जनजीवन उध्वस्त झाले असून या भागातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपल्या खासदारनिधीतून 50 लाख रुपये देणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज कोल्हापूर येथे केली. ना. रामदास आठवले आज हैद्राबाद मार्गे कोल्हापूरात सकाळी दाखल झाले। त्यांनंतर त्यांनी कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.त्यानंतर सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुनर्वसनासाठी प्रत्येकी 25 लाख असे एकूण 50 लाख रुपयांचा निधी खासदरनिधीतुन देणार असल्याची घोषणा केली.
कोल्हापूरमधील रांगोळी; कडोली; इंगळी; आंबेवाडी; जाधववाडी कोल्हापूर शहर आदी भागांत पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या त्यांच्याशी संवाद साधत अडचणी तक्रारी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गावा आणि परिसरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेला महापूर हा महाजलप्रलय होता. त्यातून या पुरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची मदतीची गरज आहे. या पुरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वांनी मिळून पुरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

सांगली आणि कोल्हापुरात कमी वेळात अतिप्रचंड पाऊस झाला. त्या अतिवृष्टीने महापूर प्रलय होऊन आला. त्या महासंकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना शासन प्रशासन आणि स्थानिक गावकाऱ्यांनी मदत करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व जण माणुसकीचे हात पुढे करीत असून पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.अश्यावेळी कोणीही राजकारण न करता माणुसकी जिवंत ठेऊन मदतीसाठी पुढे यावे तसेच अधिक चांगली मदत पूरग्रस्तांना होण्यासाठी शासनाला सूचना कराव्यात असे आवाहन ना .रामदास आठवले यांनी केले.

पुरग्रस्तांचे नव्या ठिकाणी पुनर्वसन करताना पुन्हा महापूराला सामोरे जावे लागेल अशी वेळ आमच्यावर येऊ नये याची काळजी घ्या अशी पुरग्रस्तांची मागणी माझ्याकडे काही पुरग्रस्तांनी केल्याची माहिती ना रामदास आठवलेंनी दिली.
महापुरासारख्या संकटाचा सामना या पूरग्रस्तांना करावा लागत आहे. झालेली दुर्घटना भीषण गंभीर आहे. या संकटकाळात आम्ही पूरग्रस्तांसोबत आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जलसंधारण खात्याचे मंत्री असताना महापूर येऊ नये तसेच दुष्काळी भागात पाणी मिळावे म्हणून नदीजोड प्रकल्प 70 वर्षांपूर्वी देशाला सुचविला होता. त्यानुसार नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात सुरू करावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कडे आपला पाठपुरावा सुरू असून पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार ला द्ययाच्या सूचना आणि पुरग्रस्तांच्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच मांडणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी ना रामदास आठवले यांच्या समवेत प्रा. शहाजी कांबळे; उत्तम कांबळे;ऍड. पंडित सडोलीकर; मंगल माळगे; जगन्नाथ ठोकळे; आदी अनेक रिपाइं चे पदाधिकारी उपस्थित होते.