Home बातम्या पूरपरिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार, 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार : नाना पटोले

पूरपरिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार, 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार : नाना पटोले

0

सांगली : गेल्या आठ दहा दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. पूरामुळे अनेक गावं वाहून गेली आहे. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आता हा पूर येण्याची कारणे शोधली जात आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या पूरपरिस्थितीला मुख्यमंत्री आणि प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सांगली कोल्हापूर पूरपरिस्थिती भयंकर आहे. या पूर परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र मधील दोन्ही मुख्यमंत्र्यांवर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार असे वक्तव्य नाना पाटोले यांनी केले आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.

नाना पटोले यांनी यावेळी आरएसएसवरही निशाणा साधला आहे. आरएसएसचे लोक पूरग्रस्थाना मदत करू लागले आहेत. पण त्यावर लेबल लावत आहेत. येथे राजकारण सुरू आहे. एकीकडे माणूस मरतोय आणि दुसरीकडे राजकारण सुरू आहे. जो आपल्या पक्षाचा आहे त्यालाच बाहेर काढले जाते आहे. माणुसकीला काळिंबा फासण्याचा प्रकार सुरू आहे. असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील म्हणतात की आम्हाला पावसाचा अंदाज नव्हता आणि आमदार निवडूण येणार हा कसा अंदाज बांधतात. असा टोलाही त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. तसेच राज्यसरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पूरपसिस्थिती निर्माण झाली आहे. हा आमचा आरोप नसून वस्तुस्थिती असल्याचेही ते म्हणाले आहेत.