Home ताज्या बातम्या सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

0
सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मुंबई, दि. १२ : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरानजीक भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करताना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

काल रात्री ९ च्या सुमारास भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅंकमधील मैला सफाई करताना पाच जणांचा  गुदमरून मृत्यू झाला होता. एका कामगारास गंभीर अवस्थेमध्ये अंबेजोगाई  येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती होताच त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.