Home ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियमात सुधारणा

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियमात सुधारणा

0
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियमात सुधारणा

        मुंबई, दि. 24 :  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, 1997 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कलम 24 अ नुसार राज्य शासन आदेशाद्वारे विनाअनुदानित खाजगी तंत्रनिकेतन किंवा मंडळाशी संलग्न संस्था याद्वारे चालविण्यात येणाऱ्या प्रत्येक पदविकास्तरीय तंत्र शिक्षण देण्याचा प्रत्यक्ष खर्च ठरविण्यासाठी एक फी निश्चिती समिती गठित करील. शासन या आदेशामध्ये फी निश्चिती समितीचा अध्यक्ष व सदस्य यांच्या वित्तलब्धी व इतर देय भत्ते, पदावधी व सेवेच्या शर्ती असणार आहे.

दीर्घ शीर्षाची सुधारणा, उद्देशिका, कलम 2, 5, 6, 20, 22, 23, 24 अ, 25, 26, 27, 32, 33, 34, 34 अ, 37, 46, 47 यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच कलम 4 अ व कलम 35 अ समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कलम 35,  38 व  कलम 38 मध्ये अनुसूची बदली दाखल केले आहे.

सुधारणांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कलम 4 अ नुसार अध्यापन, संशोधन, विस्तार व सेवा यांद्वारे ज्ञान व सामंजस्य यांचा प्रसार, निर्मिती व जपणूक करणे, ही मंडळाची सर्वसाधारण उदि्दष्टे असतील. कलम 35 अ नुसार संस्थेच्या व्यवस्थापनाच्या बदलाकरीता किंवा हस्तांतरणाकरीता शासनाची परवानगी मागणारे व्यवस्थापन, मंडळाने किंवा यथास्थिती नियामक प्राधिकरणाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार मंडळाच्या सचिवाला, मंडळाद्वारे किंवा यथास्थिती, नियामक प्राधिकरणाद्वारे विहित करण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज करतील. या सर्व कलमांमधील सुधारणा, नवीन कलम समाविष्ट करणे व बदली कलम दाखल करणेबाबत शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे.

00000