Home गुन्हा पुणे: बुधवारपेठेत पतीने केला पत्नीचा खून

पुणे: बुधवारपेठेत पतीने केला पत्नीचा खून

0

पुणे : परवेज शेख

पुण्यातल्या बुधवार पेठ भागात पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीवर चाकूचे वार करुन तिचा खून केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत. मीना गब्बर काझी शेख असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हिरामूल शेख असे तिच्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेत मीना गब्बर काझी शेख आणि तिचा पती हिरामूल हे दोघे गेल्या काही वर्षांपासून वास्तव्य करत होते. या दोघांमध्ये कायमच वाद होत असत. अशाच प्रकारच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केली.

या घटनेत मीनाचा जागीच मृत्यू झाला. मीनाच्या हत्येप्रकरणी हिरामूलला अटक करण्यात आली आहे.

Dailyhunt