Home अश्रेणीबद्ध व्यापाऱ्याला लुटणारा फरार चोरटा १९ वर्षांनंतर जेरबंद

व्यापाऱ्याला लुटणारा फरार चोरटा १९ वर्षांनंतर जेरबंद

0

पुणे : परवेज शेख

सोने-चांदी विक्रीच्या व्यापाऱ्यायावर कोयत्याने वार करुन १ लाख ८७ हजार रुपयांची रोकड पळविणाऱ्यास गुन्हे शाखेने तब्बल १९ वर्षांनी जेरबंद केले आहे. राजू जगन्नाथ गायकवाड ( वय ४५, रा. दिवे, पुरंदर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गेल्या १९ वर्षांपासून तो फरार होता. त्याला शंकरशेठ रस्त्यावर त्याला पकडण्यात आले. याप्रकरणी इंदरमल जैन (वय ४२, रा. परळ, मुंबई ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.