Home अश्रेणीबद्ध बनावट नोटा विकण्यासाठी येणाऱ्या इसमास अटक

बनावट नोटा विकण्यासाठी येणाऱ्या इसमास अटक

0

मुंबई : शफीक शेख
कॉम्पुटरवर स्कॅन करून प्रिंटरने 500 च्या आणि 2000 च्या बनावट नोटा बनवून ते विक्री साठी आणणाऱ्या इसमास ठाणे क्राईम ब्रांच युनिट 5 ने अटक केली आहे.

युनिट 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की भारतीय चलनाच्या 500 आणि 2000 रुपयाच्या बनावट नोटा विक्री साठी दोन इसम ठाणे हायवेवरील आरटीओ जवळ येणार आहेत, त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना सांगितली त्यांनी माहितीची खात्री करून सापळा रचून कारवाईचे आदेश दिले .मिळालेल्या माहिती प्रमाणे एक संशयित इसम नोटा विक्री साठी आरटीओ येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, त्याची झडती घेतली असता त्याच्या पाठीवर असलेल्या काळ्या रंगाच्या सॅक मध्ये 500 रुपयाच्या 2, 83, 000/- किमतीच्या 566 बनावट नोटा मिळाल्या, या नोटा व आरोपीस ताब्यात घेऊन वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे 489(अ ), 489(ब ), 489(क ), 34 कलमा प्रमाणे गुन्हा दाखल केला, या आरोपीचे नाव काळुराम बुद्धा इंदवाळे राहणार कसारा तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे असून त्याच्या बरोबर इतर मुख्य  आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्या साठी पोलीस त्यांच्या मागावर आहेत, आरोपी काळुराम इंदवाळे  याने नोटा बनवण्याचे सर्व साहित्य पोलिसांना काढून दिले, या मध्ये कॉम्पुटर, प्रिंटर, स्कॅनर, सफेद रंगाचे कागद, वजन काटा, सफेद रंगाचे लाकडी फळी, तीन शाईच्या बाटल्या, सफेद निळ्या रंगाची इलेक्ट्रिक इस्त्री, लाल रंगाचा मार्कर पेन, नोटा छापण्यासाठी दोन पाच लिटरचे केमिकल असलेले प्लास्टिकचे कँन, हे सगळे साहित्य पोलिसांनी जप्त केले.  ह्या नोटांच्या विक्री मध्ये पकडलेला आरोपी हा काळुराम इंदवाळे हा फक्त विक्री साठी नोटा घेऊन जाण्याचे काम करत होता, भारतीय चालना सारख्या हुबेहूब नोटा बनवण्याचे काम मुख्य आरोपी करत असे, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत, विशेष म्हणजे नोटा बनवण्याचा जो पेपर आहे तो कुठे सहजासही मिळत नाही त्याला जाळण्याचा प्रयत्न केला तरी जळला जात  नाही असा पेपर त्यांनी कुठून आणला  हे मुख्य आरपोली  ताब्यात घेतल्या नंतरच समजेल, तसेच आता पर्यंत त्यांनी किती जणांना ह्या नोटा दिल्या आहेत हे सुध्दा सिद्ध होणे बाकी आहे, विक्री करताना हे आरोपी 50, 000/- हजारच्या बनावट नोटा 20, 000/- हजार रुपयाच्या खऱ्या नोटा घेऊन देत असत. त्यांनी आतापर्यंत अशा किती नोटा बाजारात आल्या असतील याची माहिती मुख्य आरोपीला पकडल्या नंतरच समजेल