Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार यांनीही नितीन देसाई यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.

०००

संजय ओरके/विसंअ/