Home बातम्या शिवसेना नेते रणजितसिंह देशमुखांच्या भेटीने खटाव तालुक्यातील छावणी चालकांना दिलासा

शिवसेना नेते रणजितसिंह देशमुखांच्या भेटीने खटाव तालुक्यातील छावणी चालकांना दिलासा

0

माण खटाव : डॉ विनोद खाडे
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले, त्यामध्ये पुराच्या पाण्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले, माण खटाव मध्ये मात्र उलट परिस्थिती असून अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्याने येथील जनतेला अजूनही पिण्यासाठी पाणी नाही, तर जनावरं सुद्धा चारा छावणीतच आहेत.कृष्णा, कोयनेतुन सोडलेलं जादा पाणी जरी आमच्या तालुक्यात सोडलं असतं तरी देव पावला असता,अशी केविलवाणी मागणी येथील तहानलेल्या जनतेनं केली आहे. पहा बातमी सविस्तर
येथील हरणाई उद्योग समूहा अंतर्गत, खटाव माण मधील हरणाई सूतगिरणी, माणदेशी प्रबोधनकार सूतगिरणी, आदींचे संस्थापक शिवसेना नेते रणजीतसिंह
देशमुख यांनी खटाव माण तालुक्यातील सुमारे 70 हुन अधिक चारा छावण्याना मायेचा आधार दिला आहे.सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नुकतीच भरीव मदत करून आल्यावर देशमुखांनी खटाव तालुक्यातील चारा छावण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील मांडवे, तडवळे, कातर खटाव,यलमरवाडी,एनकुल,कणसेवाडी,काण्हरवाडी
हिवरवाडी व पडळ आदी सुमारे 10 गावातील छावण्यामध्ये भेट देऊन विचारपूस केली. या भेटीत छावणी चालकांचे रखडलेले शासकीय अनुदान, लोकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,लोकांच्या अडचणी
आदी बाबीवर गंभीर चर्चा करण्यात आली.”भैय्यासाहेब तुम्ही काहीही करा,पण पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा” “निदान कृष्णा, कोयनेचे सोडलेलं जादा पाणी तरी आम्हाला मिळवून द्या”अशी साद यावेळी लोकांनी घातल्याने देशमुख ही भावनिक झाले.”मी तुमच्यातीलच
असून शेवटपर्यंत लढा देऊन ,तुम्हाला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही” असं ठामपणे देशमुखांनी सांगून छावणीवरील पशुपालकांना मिठाई वाटप केले.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते राजूभाई मुलाणी, निलेश घार्गे,मुबारक मुल्ला आदींची उपस्थिती होती