Home गुन्हा एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

0

पुणे : परवेज शेख

दिनांक 21/8 /2019 रोजी अकरा वाजता लोखंडी ब्रिज जवळ नदीकिनारी भिंतीजवळ 13 ताडीवाला रोड पुणे या ठिकाणी विक्रम कदम वय 36 वर्ष राहणार ताडीवाला रोड पुणे हे त्यांच्या मित्रांबरोबर थांबले असताना तीन चार आरोपी तोंडाला रुमाल बांधून तेथे आले आणि तु मोठा भाई झालास का असे म्हणून त्यांच्या हातातील धारदार असणाऱ्या लोखंडी हत्याराने त्यांच्या डोक्यावर मानेवर हातावर वार करून फिर्यादी यांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.