Home गुन्हा जुन्या भांडणामुळे तरुणाच्या डोक्यात कोयता मारूण जिवे मारण्याचा प्रयत्न

जुन्या भांडणामुळे तरुणाच्या डोक्यात कोयता मारूण जिवे मारण्याचा प्रयत्न

0

जुन्या भांडणामुळे तरुणाच्या डोक्यात कोयता मारूण जिवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : परवेज शेख

दि. २४/०८/२०१९ रोजी दहीहंडीचा सण साजरा होत असताना सदर भागात राहणारे फिर्यादी व त्यांचा मित्र हे दहीहंडी पाहण्यासाठी गेले होते. दहीहंडी बघत असताना गर्दीमध्ये
फिर्यादीच्या मित्राचा धक्का यातील आरोपी संकेत जाधव याला लागला. याच कारणावरुन आरोपी व फिर्यादीच्या मित्राची बाचाबाची सुरु झाली. त्यामध्ये फिर्यादी याने दखल घेवून सदरचे वाद
मिटवले होते. “आरोपींनी तुला बधुन घेतो” असे म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी श्रवण जाधव हे घरी जात असताना सर्जा हॉटेल जवळ आरोपी विनायक गायकवाड, किशोर रामावत,
संकेत जाधव हे मोटारसायकलवरुन आले व फिर्यादीच्या लक्षात येण्यापुर्वीच आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात कोयता व पाठीत तलवारीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी जखमी झाल्याने स्थानिक लोकांनी तात्काळ हॉस्पीटलमध्ये अँडमिट केले होते. त्याबाबत वरील आरोपीविरुध्द चतुःश्रृंगी पो स्टे येथे गुन्हा दाखल झाला.

वरील गुन्हयाचा समांतर तपास युनिट ४ कडील तपास अधिकारी व कर्मचारी हे करीत असताना पोलीस कर्मचारी विशाल शिर्के व शंकर संपते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली
की, वर नमुद गुन्हयातील आरोपी हे हॉटेल अभिमान श्री. सेंट जोसेफ स्कूलसमोर, पाषाण रोड, पुणे येथे नातेवाईकांची वाट पाहत थांबलेले असून ते बाहेरगावी पळून जाणार आहेत अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने बातमीप्रमाणे तगीच्या ठिकाणी जावुन वरील आरोपींना शिताफिने पकडून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी आपली नावे

1) विनायक सुनिल गायकवाड, वय-२५ वर्षे रा. पाषाण गांव
2) किशोर लक्ष्मण रामावत, वय-२४ वर्षे रा. संजय गांधी वसाहत,
3) संकेत राजू जाधव, वय-२०, रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रोड, आंध, पुणे अशी असल्याची सांगितली. त्यांनी दाखल गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवून पुढील तपासकामी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यातील विनायक सुनिल गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याचे विरुध्द शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहे. त्यास यापूर्वी तडीपार सुध्दा केले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे, मा पोलीस उप आयुक्त श्री बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक श्री अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड, निलेशकुमार महाडिक, पोलीस कर्मचारी, सुनिल पवार, सचिन ढवळे, विशाल शिर्के, शंकर संपते, गणेश काळे, शंकर पाटील, शितल शिंदे यांनी केली आहे.