Home बातम्या ठाणे नगर येथे जुगार अड्ड्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा घटक १ व स्थानिक पोलिसांचा संयुक्त छापा

ठाणे नगर येथे जुगार अड्ड्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा घटक १ व स्थानिक पोलिसांचा संयुक्त छापा

0

मुंबई : शफीक शेख

ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत चालणारे अवैध धंदे वर कार्यवाही करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांनी सर्व परिमंडळ चे पोलिस उपायुक्त व गुन्हे शाखेला दिले होते.
चँरीटेबल ट्रस्ट क्लबच्या नावा खाली पते खेळून मोठा प्रमाणात जुगार खेळला जातो ही माहिती ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रवीण पवार यांना मिळाली होती.
अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) ठाणे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक: २८-०८-२०१९ रोजी पहाटे इंडियन चँरीटेबल ट्रस्ट,स्टेशन रोड, ठाणे नगर, ठाणे या क्लबवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा घटक १ चे अधिकारी व स्टाफ यांनी छापा टाकून कारवाई केली.
सदर छाप्या दरम्यान सदर क्लबचे दोन मजली इमारती मध्ये एकूण ९१ जण अवैध्यरित्या पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून जुगार साहित्य, टेबल, रोख रकम मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 
पुढील तपास ठाणे नगर पोलिस करत आहे.