Home गुन्हा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे

0

पुणे : परवेज शेख

तडीपार गुन्हेगारांवर युनिट ४.गुन्हे शाखेकडून कारवाई
पुणे शहरात आगामी विधानसभा मतदान, गणेशोत्सव,नवरात्र इ.महत्वाच्या सणाच्या अनुशंगाने पुणे शहराचे वेगवेगळ्या ठाण्याच्या हददीतून गुन्डेगारांना तडीपार केलेले आहे तसेच इतर प्रतिबंधात्मक कारवाई चालू आहे.

मा श्री अशोक मोराळे,अपर पोलीस आयुक्त साो, गुन्हे पुणे शहर यांना माहिती मिळाली की, तडीपार केलेले गुन्हेगार हे तडीपार केलेल्या ठिकाणी न राहता ते पुणे शहरात आपले अस्तित्व
लपवून रहात आहे. त्याबाबत मा अपर पोलीस आयुक्त सो.गुन्हे.पुणे यांनी गुन्हे शाखेचे सर्व युनिट शाखा सदर तडीपार गुन्हेगाराचा शोध घेवून कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. .

त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ४ कडील पोलीस कर्मचारी राजू मये यांची तडीपार गुन्हेगारांचा शोध घेणेकामी खास नेमणूक केली. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती घेवून सापळा
रचून ०४ दिवसांच्या आत खडकी पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचेकडून तडीपार
केलेले खालील गुन्हेगारांची माहिती घेवून सापळा रचून ताब्यात घेतले

१. महेश दिलीप गोरे वय २० वर्षे रा.पवळे चाळ,डॉ राजेन्द्रप्रसाद शाळेमागे,बोपोडी,पुणे

२. आशिष संजय लोखंडे,वय २२ रा. स नं २६, बोपोडी.पुणे

३. हैदर हुसेन ऊर्फ शफान इराणी,वर २३ वर्षे, रा. विष्णुकृपा तरुण मंडळ, शिवाजीनगर एस टी स

वरील ०३ तडीपार गुन्हेगारांविरुध्द कचारी राजू मये यांनी ते विनापरवाना कार्यक्षेत्रात मिळुन
आलेबाबत संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही मा, अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराने मा पोलीस उप आयुक्त श्री बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक श्री अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजू मचे, शंकर पाटील,सचिन ढवळे गणेश काळे, अतुल मेंगे,राकेश रानवे यांनी केली आहे.