Home शहरे अहमदनगर अहमदनगरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

अहमदनगरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

0

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गुणोरे गावात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकरी कुटुंबातील आई-वडील आणि 2 मुलांनी आपले आयुष्य एकाच वेळी संपवले आहे. आत्महत्त्ये मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस येथे दाखल झाली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मात्र एकाच कुटुंबातील चार जणांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.