नाशिक : इगतपुरी येथील रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर अवघी वर्षभराची चिमुरडी बेवारस स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इगतपुरी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर आज सकाळी पाटील कँटीनजवळ आरपीएफचे जवान विजय माने हे गस्त घालत असताना त्यांना तिथल्या बाकावर पिवळ्या शॉलमध्ये गुंडाळलेली एक मुलगी रडताना आढळली.
चिमुरडी पाहून त्यांनी आजूबाजूला पालकांचा शोध घेतला, परंतु त्यांना कुणीही आढळून आले नाही. यानंतर त्यांनी तत्काळ लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेऊन तिच्या पालकांचा शोध सुरू केला आहे. सध्या इगतपुरी लोहमार्ग पोलीस या चिमुरडीची काळजी घेत आहेत.
- Advertisement -