Home गुन्हा वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत रिक्षाचालकांनी केली मारहाण

वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत रिक्षाचालकांनी केली मारहाण

0

वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत रिक्षाचालकांनी केली मारहाण

दोन रिक्षाचालकांनी मिळून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 29) रात्री आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात घडली.

पोलीस शिपाई लक्ष्मण छगन कोल्हे (वय 31) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ऑटो रिक्षा (एम एच 14 / सी यु 2739) वरील चालक आणि एका ओळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई लक्ष्मण कोल्हे निगडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते गुरुवारी रात्री आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपींनी संगणमत करून त्यांच्याशी हुज्जत घातली. पोलीस शिपाई कोल्हे यांना वाहतूक नियमन करण्याच्या कामापासून परावृत्त करत आरोपींनी कोल्हे यांना शिवीगाळ आणि हाताने मारहाण केली. आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलिस तपास करीत आहेत.