पुणे : परवेज शेख
दि.२८/०८/२०१९ रोजी रात्रौ गुन्हे शाखा,युनिट-०४ चे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड व पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांना खबर मिळाली की,वरील दाखल गुन्हयातील महसूल पथकाचे ताब्यातून पळवून नेलेला ट्रक टाटा हायवा टिपर नं.ट्रक नं.एम एच/४२/टी/८१०९ हा दौंड येथून वाळू घेवून पुणे शहरामध्ये वाळू विक्रीसाठी येणार आहे.सदरबाबत मा.पोलीस निरीक्षक श्री अंजुम बागवान यांनी पुणे सोलापूर रोडवर ट्रॅप लावून सदरचा ट्रक ताब्यात घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड,पोलीस कर्मचारी शितल शिंदे,सुरेंद्र साबळे,रमेश
चौधर,निलेश शिवतरे यांनी रात्रीपासूनच पुणे सोलापूर रोडवर गस्त घालून ट्रॅप लावला असता दि.२९/०८/२०१९ रोजी दुपारी ०२.०० वा.सुमारास वरील स्टाफला पुणे सोलापूर हायवे,शेवाळवाडी या ठिकाणी संशयित ट्रक नं.एम एच/४२/टी/८१०९ हा पुण्याचे दिशेने येताना दिसला असता.नमूद ट्रक (वाळूसह) व आरोपी ट्रक चालक नामे शेखर विठ्ठल खैरे,वय-२५ वर्षे,रा.हिंगणी बेरडी,ता.दौंड,जि.पुणे यास जागीच पकडून पुढील कार्यवाहीकामी हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात सुपूर्द करण्यात आलेले आहे.पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशन महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा बांबे हया करीत आहे.
सदरची कामगिरी ही मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.अशोक मोराळे,पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री.बच्चनसिंग,पोलीस निरीक्षक श्री.अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.विजय झंजाड,पोलीस कर्मचारी सुरेंद्र साबळे,शितल शिंदे,रमेश चौधर,निलेश शिवतरे सर्व नेमणूक गुन्हे शाखा,युनिट-०४ यांचे पथकाने केलेली आहे.