Home गुन्हा पिस्टल बाळगनारा सराईत गुन्हेगारास युनिट-१ गुन्हे शाखेकडुन अटक

पिस्टल बाळगनारा सराईत गुन्हेगारास युनिट-१ गुन्हे शाखेकडुन अटक

0

पुणे : परवेज शेख

दिनाक ३०/०८/२०१९ रोजी युनिट-१, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील स्टाफ पुणे शहराचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना बातमिदारांमार्फत माहीती मिळाली की, पुणे शहराच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सुजित देवकुळे हा जागेचे व्यवहार करीत असून त्याच्या जवळ पिस्टल आहे व तो विघ्नहर्तानगर, बिबवेवाडी येथील पवार मंडप दुकानाजवळ उभा आहे त्याचे कमरेस पिस्टल आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्या बाबत वरिष्ठांना माहिती देवुन वरिष्ठांचे परवानगीने युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सुजित मिनानाथ देवकुळे, वय ३२ वर्ष, रा स नं ६४९, विघ्नहर्तानगर बिबवेवाडी पुणे असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन १ देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे व १ रॅम्बो चाकू असा एकुण ३७,४००/- किंमतीचा माल जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपीवर बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं.२६३/२०१९ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), ४(२५), व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५, प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीकडे पिस्टल बाबत चौकशी केली असता तो जमिन खरेदी विक्रीचा व्यावसाय करतो त्यामध्ये त्याचा काही लोकांसोबत वाद झाले होते त्या बाबत त्याचे विरुध्द सिंहगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता त्या लोकां सोबत त्याची दुश्मनी झाल्यामुळे पिस्टल बाळगल्याचे सांगितले.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री अशोक मोराळे, मा. पोलीस उप आयुक्त,गन्हे, श्री बच्चन सिंह, यांचे मार्गदशनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, हनुमंत शिंदे, पोलीस कर्मचारी, अमोल पवार, अजय थोरात, वैभव स्वामी, तुषार माळवदकर, योगेश जगताप, बाबा चव्हाण, हनिफ शेख, सुभाष पिंगळे यांनी केली आहे.