Home ताज्या बातम्या पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा सन २०१९” या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम मा.डॉ.के.व्यंकटेशम् पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.

पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा सन २०१९” या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम मा.डॉ.के.व्यंकटेशम् पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.

0

पुणे : परवेज शेख

दि.३१/०८/२०१९ रोजी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे सायंकाळी ०५.०० ते ०७.०० या वेळेत “३७ वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा सन २०१९” या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम मा.डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.

३७ वी परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धे मध्ये पुणे शहर व पिंपरी चिंचवड
पोलीस आयुक्तालयाकडील एकूण १६० पोलीस खेळाडूंच्या ४ संघानी सहभाग घेतला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, कुस्ती, बॉक्सिंग, ज्यूदो अशा विविध सांघिक व वैयक्तिक क्रिडा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. जनरल चॅम्पियनशिप ट्राफीचा मान मुख्यालय व इतर शाखा या संघाने पटकवला.

मा.डॉ.के.व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते सर्व विजेत्या
खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच चीन येथे झालेल्या जागतिक पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करुन पुणे शहर पोलीस दलाचे नाव उज्वल केलेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. मा.डॉ.के.व्यंकटेशम, पोलीस आयुक्त यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करुन पुढील स्पर्धेकरीता त्यांचे मनोबल वाढविले.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.विरेंद्र मिश्र पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, आभार प्रदर्शन श्री.संभाजी कदम,पोलीस उप आयुक्त, आ.गु.शा यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री.कल्याणराव विधाते, सहायक पोलीस आयुक्त, मानव संसाधन विभाग व रापोउनि श्री.अशोक टोके यांनी केले.

सदर कार्यक्रमाकरीता मा.पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम्, मा.सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, श्री अशोक मोराळे,श्री.सुनिल फुलारी, श्री.श्रीकांत तरवडे, सर्व पोलीस उप आयुक्त व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी/कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते.