Home गुन्हा पुणे व औरंगाबाद येथे घरफोडी व चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास मुद्येमालासह अटक.

पुणे व औरंगाबाद येथे घरफोडी व चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास मुद्येमालासह अटक.

0

पुणे : परवेज शेख

दिनांक ३१/०८/२०१९ युनिट – १ गुन्हे शाखे कडिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अरूण वायकर, पोउनि शिंदे, पो हवा जिनेडी, पो हवा थोरात, पो ना खडके, पो हवा घाडगे, पो शि माळवदकर, पो ना मोमीन असे शिवाजीनगर एस टि स्टॅण्ड परिसरात पेट्रोलिंग करीत होते.

त्याचे नांव पत्ता – सय्यद हनिफ सय्यद हबीब, वय २० वर्षे, रा.
औरंगाबाद असे असुन त्याचे अंगझडतीमध्ये त्याने चोरी केलेला मोबाईल फोन, तसेच सोन्याचे दागिणे त्यामध्ये एक नेकलेस, एक मंगळसुत्र, कानातील रिंगा, व रोख पाच हजार रूपये असा एकुण रु. ४९,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.

त्याबाबत आरोपीकडे तपास करता सदर मोबाईल त्याने बुधवार पेठेतून चोरल्याचे व सोण्याचे दागीने हे त्याने दिनांक-३०/०८/२०१९ रोजी औरंगाबाद येथे केलेल्या घरफोडीतील असल्याचे कबुल केलेले आहे.

दोन्ही घटनांबाबत फरासखाना पो स्टे गुन्हा रजि नं ३०८/२०१९ भादवि क ३७९ प्रमाणे व औरंगाबाद येथील जिन्सि पो स्टे ला गुन्हा रजि नं ३४४/२०१९ भादविक ४५७, ३८० प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदर आरोपी विरुध्द यापुर्वीचे चो-या व हाणामारीचे एकुण अनेक गुन्हे नोंद असुन त्याचे विरुध्द जिन्सी पोलीस ठाणे औरंगाबाद कडून तडीपारीची कारवाई सुध्दा करणेत आली होती.

सदर घटनेसंदर्भातील कारवाई ही श्री.अशोक मोराळे सा… अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री.बच्चनसींग सो., पोलीस उप-आयुक्त, गुन्डे, व डॉ.श्री.शिवाजी पावार, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे यांचेमार्ग दर्शनाखाली करण्यात आलेली आहे.