Home ताज्या बातम्या लोकशाही बळकट करण्यात पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची -उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

लोकशाही बळकट करण्यात पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची -उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

0
लोकशाही बळकट करण्यात पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची -उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ७ :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदे’निमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आणि भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६० वी परिषद  नुकतीच विधानभवन, मुंबई येथे झाली. संसदीय लोकशाहीत, लोकशाहीच्या प्रक्रियेत जनतेला न्याय देण्यासाठी पीठासीन अधिकारी यांची अतिशय महत्त्वाची भूमिका ठरते. परिषदेत घेतलेले निर्णय पंचायतराज ते संसदेपर्यंत लोकशाही संस्थांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. मुंबईत झालेल्या या परिषदेत देशातील लोकशाही संस्थांना नवी दिशा देण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000