Home ताज्या बातम्या दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा – पालकमंत्री संजय राठोड

दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा – पालकमंत्री संजय राठोड

0
दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीचे कामे तत्काळ सुरू करा – पालकमंत्री संजय राठोड

मुंबई, ‍‍दि. ८ : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि दारव्हा बसस्थानक पुनर्बांधणीच्या कामास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या बसस्थानकाची पुनर्बांधणीची कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

मंत्रालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील प्रलंबित विषयाबाबत बैठक झाली.

पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले की, दिग्रस आणि दारव्हा येथील अत्याधुनिक बसस्थानकांमुळे नजिकच्या सर्व भागातील नागरिकांची सुलभ प्रवासाची सोय होणार आहे. या बसस्थानकातील विद्युत व्यवस्था, पेव्हर ब्लॉक, काँक्रिटीकरण, वाहनचालक विश्रांतीगृह या कामांनाही मंजुरी मिळाली आहे. ही कामे उत्कृष्ट दर्जाची करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री.राठोड यांनी दिल्या.

एसटी महामंडळातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत, बसस्थानक निधी, जादा बसेस मिळणे या विषयाबाबतही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी आढावा घेतला.

या बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव श्री. होळकर, परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक श्री.बरसट तसेच परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

शैलजा पाटील/विसंअ/