Home ताज्या बातम्या शहरातील नागरिकांच्या हातात महानगरपालिकेचे मानांकन

शहरातील नागरिकांच्या हातात महानगरपालिकेचे मानांकन

0

 शहरातील नागरिकांच्या हातात महानगरपालिकेचे मानांकन*
पुणे – केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण योजनेंतर्गत या वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. यांतर्गत शहरातील नागरिकांना केंद्रीय यंत्रणेकडून प्रश्‍न विचारले जाणार असून त्यांच्या उत्तरावर स्वच्छतेचे मानांकन निश्‍चित होणार आहे. त्यामुळे सर्वेक्षणांतर्गत पालिकेने केलेल्या स्वच्छतेच्या कामाची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नागरिकांचे मत पालिका जाणून आहे.

केंद्राकडून या वर्षीपासून स्वच्छ सर्वेक्षण योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यात, प्रामुख्याने प्रत्येक तीन महिन्याला हे सर्वेक्षण घेण्यात येत असून लोकसहभाला महत्त्व देण्यात आले आहे. या सर्वेक्षणात महापालिकेच्या शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील प्रत्येकी 48 नागरिकांना फोनवरून 12 प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने तुमचा कचरा रोज संकलीत होतो का, कचरा वेचक येतात का, कचरा वर्गीकरण करून घेतला जातो का, शहर तसेच परिसराच्या स्वच्छतेबाबत तुम्ही समाधानी आहात का, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम माहीत आहे का, अशा प्रकारच्या प्रश्‍नांचा समावेश आहे.

त्यामुळे पुणेकरांना याबाबत माहिती असावी तसेच त्यांचे काय मत आहे, सर्वेक्षणापूर्वी जानून घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून नागरिकांना माहिती पत्रके देण्यासह त्यांच्याकडून या प्रश्‍नांची उत्तरे घेतली जात आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांच्या स्पर्धेसाठी ही तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे.