Home गुन्हा रेल्वेमधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल चोरणाऱ्या सराईत जेरबंद

रेल्वेमधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल चोरणाऱ्या सराईत जेरबंद

0

पुणे : परवेज शेख

पुणे रेल्वे स्टेशन हददीमध्ये रेल्वेतील प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल चोऱ्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने मा.पोलीस अधीक्षक सो,लोहमार्ग पुणे श्री दिपक साकोरे यांनी गुन्हयांना आळा बसण्यासाठी मोहीम राबवणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे यांना आदेश दिला.त्याप्रमाणे पोलीस नाईक अमरदिप साळुकेव महात्मा वाघमारे यांना खबऱ्यामार्फत खात्रीशिरपणे माहिती मिळाली की शिवाजीनगर येथील रेकर्डवरील गुन्हेगार शाहरुख रशिद खरादी हा त्याच्या साथीदारासह अशाप्रकारचे गुन्हे करत आहे.मिळालेल्या खबरीप्रमाणे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला असता सकाळच्या वेळेस शाहरुख खरादी हा आरोपी गुन्हा करण्याच्या इरादयाने रेल्वे ट्रॅकच्या कडेला काठी घेवुन तयारीत असताना मिळुन आला.त्यास अटक करुन तपास केला असता त्याने अशाप्रकारचे गुन्हे शिवाजीनगर येथे केले असल्याची कबुली दिली .या आरोपीकडुन तपासामध्ये १६,५००/-रु किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले असुन पुणे लो.पो.ठाणे येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.यातील आरोपीकडुन १,५५,०००/-रु किमतीचे १२ महागडे मोबाईल यापुर्वी देखील जप्त करण्यात आले असुन सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी हा कारागृहातुन सुटुन आल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मा.पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे श्री.दिपक साकोरे साहेब व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कवीता नेरकर पवार मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे मौला सय्यद ,स.पो.निरी.मिलींद झोडगे ,पोलीस कर्मचारी अमरदिप साळुके महात्मा वाघमारे ,सुहास माळवदकर सचिन पवार ,इम्तीयाज अवटी ,विशाल पवार यांनी सदरची कामगिरी केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने हातावर फटका मारुन गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुध्द मोहिम उघडली असुन लोणावळा ते पुणे रेल्वे स्टेशन इददीमध्ये अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्या २,४५,००७/-रु किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले असुन १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.रेल्वेतील प्रवाशांनी मोबाईल घेवुन दरवाज्यात उभे राहुन प्रवास करताना सतर्क असावे असे मौला सय्यद पोलीस निरीक्षक स्था.गु.शाखा लो.पुणे यांनी आवाहन केले आहे.