Home ताज्या बातम्या पोलीस नाईक ते सहा.पोलीस फौजदार अशा विविध पदावर पदोन्नती झालेल्या एकूण ५१ पोलीस अंमलदार यांचा सत्कार समारंभ मा.डॉ.व्यंकटेशम् पोलीस आयुक्त,पुणे शहर यांच्या हस्ते झाला

पोलीस नाईक ते सहा.पोलीस फौजदार अशा विविध पदावर पदोन्नती झालेल्या एकूण ५१ पोलीस अंमलदार यांचा सत्कार समारंभ मा.डॉ.व्यंकटेशम् पोलीस आयुक्त,पुणे शहर यांच्या हस्ते झाला

0

पुणे : परवेज शेख

दिनांक 03/09/2019 रोजी सकाळी 10:00 ते 12:00 या वेळेत
मा.डॉ.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त,पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पोलीस नाईक ते सहा.पोलीस फौजदार अशा विविध पदावर पदोन्नती झालेल्या एकूण 51 पोलीस अंमलदार यांचा सत्कार समारंभ तसेच मा.डॉ.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त व पदोन्नतीधारक अमंलदार यांचे नातेवाईक यांचे एकत्रित हस्ते पदोन्नतीची फित लावण्याचा विशेष कार्यक्रम पोलीस आयुक्त कार्यालयाचे कॉल एक्सलन्स हॉल मध्ये पार पडला.

वयाच्या विशीत पोलीस शिपाई या पदावर भरती झालेला कर्मचारी त्याच्या सेवानिवृत्ती पर्यत २४x७ कर्तव्यावर असतो. या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देताना तो कुटूंब व अनेक कौटूंबिक क्षणांपासून दूरचं असतो.

मात्र स्वतःच्या पदोन्नतीचा क्षण व आनंद सहकारी, मित्र, नातेवाईक व
कुटूंबासमवेत साजरा करण्याची संधी पुणे पोलीस आयुक्तालयातील एकूण ५१ पोलीस कर्मचा-यांनी आज अनुभवली. यावेळी मा.डॉ. व्यंकटेशम् पोलीस आयुक्त यांचे समवेत संबंधित कर्मचा-याचे कुटूंबातील आई-वडील, पती-पत्नी, मुलगा अथवा मुलगी यापैकी एकाने कर्मचा-याच्या दुस-या खांदयावरील फित अथवा स्टार लावला.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमचं पुणे शहर पोलीस दलामध्ये अशा प्रकारे पोलीस अमंलदार यांना त्यांचे नातेवाईकांच्या हस्ते पदोन्नती फित लावण्याची अनोखी संकल्पना मा.डॉ.व्यंकटेशम् ,पोलीस आयुक्त यांनी अमंलात आणलेली आहे. या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पोलीस कुटूंबियांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली.

मोटार परिवहन विभागाकडील पदोन्नतीधारक सपोफौ कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर वेळी मा.डॉ.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचा-यांना पदोन्नती बरोबरचं येणा-या नव्या जबाबदारीचे आव्हान पेलणे याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाकरीता मा.पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम्, मा.सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, श्री अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्री.संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त श्री.मिलींद पाटील, श्री. बाबर, श्री कल्याणराव विधाते, पदोन्नतीधारक कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय हजर होते.

_ कार्यक्रमाची प्रस्तावना, आभार प्रदर्शन व सुत्र संचालन श्री.कल्याणराव विधाते, सहायक पोलीस आयुक्त, मानव संसाधन विभाग यांनी केले.