Home गुन्हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार पिस्तुलं आणि १५ काडतुसं हस्तगत; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार पिस्तुलं आणि १५ काडतुसं हस्तगत; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

0

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार पिस्तुलं आणि १५ काडतुसं हस्तगत; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला गुन्हे शाखा युनिट तीनने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चार पिस्तुलं आणि १५ काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. संबंधित पिस्तुलं आणि काडतुसं हे बाबा पांडे आणि सँडी गुप्ता यांच्या टोळीला देणार होता. मात्र त्याअगोदरच पिस्तुल पुरवणाऱ्या इसमाला अटक केली आहे. गुप्ता आणि पांडे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सिद्धार्थ ऊर्फ रौनक रिपुमन शर्मा (२२) रा. दिघी. मूळगाव बिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ शर्मा हा दिघी मॅगझीन चौक येथे बाबा पांडे आणि सँडी गुप्ताच्या सांगण्यावरून चार पिस्तुलं आणि १५ काडतुसं घेऊन आला होता. याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी त्रिनयन बाळसराफ यांना मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. त्यानुसार सापळा रचून आरोपी शर्माला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सराईत गुन्हेगार बाबा पांडे आणि सँडी गुप्ता यांच्या सांगण्यावरून बिहार येथून पिस्तुल आणि काडतुसे आणल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्यांच्या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल असून एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी जमीर तांबोळी, राहुल खारगे, सागर जैनक, सचिन मोरे, गंगाधर चव्हाण, योगेश आढारी, अरुण नरळे यांनी केली आहे.