Home गुन्हा विधि संघर्षग्रस्त बालकाकडून दुचाकी वाहन चोरीचे ४ गुन्हे उघडकीस; कोंढवा पोलिसांची कामगिरी

विधि संघर्षग्रस्त बालकाकडून दुचाकी वाहन चोरीचे ४ गुन्हे उघडकीस; कोंढवा पोलिसांची कामगिरी

0

विधि संघर्षग्रस्त बालकाकडून दुचाकी वाहन चोरीचे ४ गुन्हे उघडकीस; कोंढवा पोलिसांची कामगिरी

भूषण गरुड
पुणे शहर कोंढवा परिसरातील वाहनचोरीच्या प्रकारवर आळा घालण्यासाठी. कोंढवा पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे विधि संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता. त्याने दुचाकी वाहन चोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील कोंढवा पो.स्टेशन- ३, हडपसर पो.स्टेशन- १ असे मिळून दुचाकी वाहन चोरीचे ४ गुन्हे तपास पथकातील पोलिसांनी उघडकीस आणले.

सदर गुन्ह्यातील आरोपी विधि संघर्षग्रस्त बालक भानुदास महादेव बारसोळे(वय १७, राहणार. होलेवस्ती,उंड्री,पुणे) यास ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना सदर घटनेची माहिती देत. विधी संघर्षग्रस्त बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
कोंढवा पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे, पोलीस शिपाई अजीम शेख, शेलार तपास करत असतांना. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विधिसंघर्षग्रस्त बालक भानुदास महादेव बारोळे (वय १७, राहणार. होलेवस्ती,उंड्री,पुणे) यास सापळा रचून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता. त्याने दुचाकी वाहन चोरीचे ४ गुन्हे केल्याचे कबूल देत. त्याच्याकडून खालील प्रमाणे दुचाकी वाहन चोरीचे ४ गुन्हे तपास पथकातील पोलिसांनी उघडकीस आणले.
१) कोढवा पो.ठाणे गु.र.क्र.७४६/१९ भादवि कलम ३७९. MH-१२-NL-७७०१ -एक्सेस दुचाकी वाहन
२) कोढवा पो.ठाणे गु.र.क्र.६७३/१९भादवि कलम ३७९. MH-१२-LN-२५४६ – शाईन दुचाकी वाहन
३) कोंढवा पो.ठाणे गु.र.क्र ३४९/१९भादवि कलम ३४९. MH-१२-PF-५२५६ – डिओ दुचाकी वाहन
४) हडपसर पो.ठाणे गु.र.क्र ८६५/१७ भादवि कलम ३७९. MH-१२-HS-९९८९ – शाईन दुचाकी वाहन

सदरची कामगिरी,
मा.पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ पुणे शहर सुहास बावचे, सहा. पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर वानवडी विभाग, कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार इक्बाल शेख, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, पोलीस शिपाई अजीम शेख, उमाकांत स्वामी, शेलार यांनी केली.