Home गुन्हा मोबाईल आणि दुचाकी गाडी चोरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

मोबाईल आणि दुचाकी गाडी चोरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

0

पुणे : परवेज शेख

दिनांक : १८/०७/२०१९ तपास पथकातील अधिकारी सपोनि चव्हाण यांना मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील अधिकारी स.पो.नि. संजय चव्हाण, व तपास पथकातील कर्मचारी असे हडपसर परिसरात गणेश उत्सवाच्या अनुषंगाने हडपसर गाडीतळ भाजी मंडई येथे पेट्रोलिंग करीत असताना पो.ना. ६४८९ विनोद शिवले व पो. शि. ८६९२ अकबर शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रिशी बातमी मिळाली कि, गाडीतळ हडपसर येथे मार्केट मध्ये संशियरित्या गर्दीच्या ठिकाणी फिरत आहे.त्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी सपोनि संजय चव्हाण व तपास पथक यांनी सापळा लावुन नंबर प्लेट नसलेल्या मोटार सायकल वरील तीन इसमांना पकडून त्यांना हडपसर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकल व पिशवीतील मोबाईल बाबत विश्वासात घेवुन विचारणा केली असता त्यांनी त्यांचे ताब्यात असलेली मोबाईल फोन व मोटार सायकल ही चोरी केली असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) किरण हनुमंतअप्पा किकी, वय २२ वर्षे, रा. रेल्वे क्रॉसिंग जवळ, घोरपडीगाव, पुणे मुळगाव भोईकालवाडी, ता. भद्रावती, जि. शिमोगा, राज्य- कर्नाटक, २) मधु रामु गुंजाळा, वय १९ वर्षे, रा. सध्या पुणे फिरस्ता. मुळगांव- संतोषनगर, अरागडडा जवळ, हैद्राबाद, राज्य आंध्रप्रदेश, ३) राजु सिताराम राजन, वय ३५ वर्षे, रा. सध्या पुणे फिरस्ता, मुळगाव- नाराकेटपल्ली, जी.एफ.टी. चर्चजवळ, ता. चिटीयाला, जि. नालगोंडा, राज्य तेलंगाना असे सांगितले. तेव्हा त्यांना हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ८८५/२०१९ भादविक ३७९ या गुन्हयात अटक करण्यात आले आहे..


अटक आरोपी यांचेकडुन हडपसर पोलीस स्टेशन कडील ०१ दुचाकी चोरीचा गुन्हा व ०२ मोबाईल चोरीचे गुन्हे असे एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडून एकुण १,९३,६००/- रुपये किंमतीचे हडपसर परिसरातुन तसेच पुणे शहर व बाहेरील जिल्हयातुन चोरी केलेले एकुण एकुण ४३ मोबाईल फोन व हडपसर पोलीस स्टेशकडील चोरीस गेलेली ०१ मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन बाबत तपास करुन आणखीन गुन्हे
उघडकीस येतील.

सदरची कामगिरी मा. सुनील फुलारी, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मा. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर व मा. जोत्सना रासम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली मा. रघुनाथ जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे पुणे व हमराज कुंभार, पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे सुचनानुसार सहा. पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, सहा.पो.फौजदार युसुफ पठाण, पो.हवा. संपत औचरे, पो.हवा, राजेश नवले. पो.ना, प्रताप गायकवाड, पो.ना, सैदोबा भोजराव, पो.ना. विनोद शिवले, पो.ना. गणेश दळवी, पो.शि.अनिल कुसाळकर, पो.शि. अकबर शेख, पो.शि. शंशीकांत नाळे, पो.शि. गोविंद चिवळे, पो.शि. अमित कांबळे, पो.शि. ज्ञानेश्वर चित्ते, पो.शि. विजय पवार यांनी केलेली आहे