Home ताज्या बातम्या सराईत गुन्हेगारास चंदन नगर पोलिसांनी पकडलेले

सराईत गुन्हेगारास चंदन नगर पोलिसांनी पकडलेले

0

पुणे : परवेज शेख

चंदननगर पोलिस स्टेशन गु. र. क्र. ३३३/२०१९ भा द. विकलम ४३५. ३४ या गन्ह्यात दि ३०/०८/२०१९ रोजी फिर्यादी यांची स्कॉर्पिओ गाडी जाळुन आरोपी नामे तेजस चंपलाल उनेचा रा हॅपी कॉलोनी गोसावी वस्ती कोथरुड पुणे मूळ राराजस्थान हा त्याचे साथीदारांसह फरार झाला होता.

सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान प्राप्त माहितीनुसार
दि.०२/०९/२०१९ रोजी सायंकाळी सदर आरोपी हा खराडी बायपास पुणे परिसरात येणार असल्याची तपास पथकास माहिती मिळाले वर सदर ठिकाणी सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याने सदर चा गुन्हा त्याचे आणखी २ फरार साथीदारांसह केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपीकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली एक इनोवा कार जप्त करण्यात आली असून सदर कार बाबत खेड पो.स्टे पुणे ग्रामीण येथे गु र क्र. २३७/१९ भाद वि कलम ४५७,३८० हा गुन्हा नोंद आहे. सदर आरोपी हा ए.पी.एम.सी पोलिस स्टेशन मुंबई येथील मोक्यातील फरार/पाहिजे आरोपी आहे.

सदरची कामगिरी मा सुनील फुलारी सो. अप्पर पोलिस आयुक्त पूर्व विभाग मा.प्रसाद अक्कानोरू सो पोलिस उपायुक्त परि-४, मा रामचंद्र देसाई सो सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री कृष्णा इंदलकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंदननगर पो.स्टे.. श्री सत्यवान पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे, तपास पथक चे पो.उपनि अंबरीश देशमुख, पो हवा प्रदीप सोनवणे, पो.ना तुषार खराडे, पो.ना. कदम, पो.शि.शंकर धुमाळ असे कर्मचारी यांनी केली आहे.