Home गुन्हा दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए.कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई

दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए.कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई

0

पुणे : परवेज शेख

विश्रांतवाडी व कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत राहणारा गुन्हेगार इसम अल्ताफ ऊर्फ बचक्या इकबाल पठाण, वय २८ वर्षे, रा. अप्पा टिंगरे चाळ, विठठल मंदीराचे मागे, धानोरी, पुणे व पठाण चाळ, खोली क्रमांक १०१, व्हि. आय.टी. कॉलेजजवळ, कोंढवा, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह कोंढवा, बंडगार्डन व कोरेगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोयता, चाकू, लाकडी काठी, लोखंडी बार, चाकू यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगुन जबरी चोरी, घरफोडी, दुखापत, दंगा यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याची गुन्हेगारी कृत्ये सन २०१३ पासून चालू आहेत. त्याचेविरूध्द ०९ गुन्हे दाखल आहेत. त्याचेविरूध्द प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून सुध्दा त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम होत नसलेचे दिसून आले होते.त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुनिल तांबे, नेमणूक बंडगार्डन पो. स्टे. यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे सादर केला होता. डॉ.के.व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचेविरुध्द नुकतेच एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करुन ठेवण्यात आले आहे.