Home ताज्या बातम्या परप्रांतातून हरवलेल्या 16 वर्षाच्या मुलास मार्केटयार्ड पोलिसांनी सुखरूप दिले नातेवाईकांच्या ताब्यात

परप्रांतातून हरवलेल्या 16 वर्षाच्या मुलास मार्केटयार्ड पोलिसांनी सुखरूप दिले नातेवाईकांच्या ताब्यात

0

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी 11:00 वा. सुमारास एका मुलास रिक्षावाल्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशनजवळ सोडून निघून गेला. तो मुलगा इकडेतिकडे संशयितरित्या फिरत असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सहानुभूतीने त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रवी राकेश गौर (वय 16, राहणार.भोपाळ) असे सांगितले. त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता. मी मित्राकडे जातो असे सांगून घरातून निघून आलो होतो. मी याठिकाणी कसा आलो याबाबत मला काहीही सांगता येत नाही. त्यानंतर त्याच्या जवळील मोबाईल फोनवरून त्याच्या वडिलांशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितले की तो माझा मुलगा असून तो कोठे आहे तो हरवल्या बाबत सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2019 रोजी मीसरोद पोलीस ठाणे, जिल्हा भोपाळ येथे तक्रार दिलेली होती.

सदर मुलाच्या कुटुंबीयांशी फोन द्वारे ओळख पटल्याने त्याचे वडील व नातेवाईक हे भोपाळ, मध्यप्रदेश याठिकाणाहून मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे आल्याने सदर मुलास त्यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. त्यावेळी त्या मुलाच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांचे आभार मानून कौतुक केले.

सदरची कामगिरी,
मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार नाशात कोंडे, पोलीस नाईक वामन पडळकर संदीप पोटकुळे, पोलीस शिपाई श्रीक्षोल, महिला पोलीस नाईक खाडे यांनी केली.