गणेशविसर्जन मुख्य मिरवणूक टिळक रोड मार्ग जाणाऱ्या गणेश मंडळांशी परिमंडळ 2 पोलिसांच्या आढावा बैठकीचे आयोजन

- Advertisement -

गणेशविसर्जन मुख्य मिरवणूक टिळक रोड मार्ग जाणाऱ्या गणेश मंडळांशी परिमंडळ 2 पोलिसांच्या आढावा बैठकीचे आयोजन

भूषण गरुड
गणेशविसर्जन मुख्य मिरवणूक टिळकरोड मार्गाने जाणाऱ्या गणेश मंडळांनी नियम व अटींचे पालन करून शांततेत गणेशोत्सव पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळाचे व नागरिकांचे पोलीस कशा प्रकारे सहकार्य घेऊ शकतील. विसर्जन मिरवणुकीच्या काळात काय करावे आणि काय टाळावे यासाठी टिळक रोड मार्गाने जाणाऱ्या गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी परिमंडळ 2 पोलिसांन तर्फे शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2019 रोजी 5:00 वा. सुमारास कटारिया हायस्कूलच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक टिळक रोड मार्गाने जाणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ही मिटिंग घेण्याचा उद्देश असा आहे की इतर पोलिस स्टेशनचे अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलले आहेत. त्यांची तोंडओळख व्हावी जेणेकरून गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांच्याशी सुसंवाद साधता येईल याच्या उपयोग विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यात मदत होईल. गणेशोत्सव म्हणजे डॉल्बीचा दणदणाट या ब्राह्मकल्पनेतून बाहेर पडावे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. क्षणिक आनंदा पलीकडे जाऊन गणेश मंडळांनी डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्याचा वापर विसर्जन मिरवणुकीत करावा. बंदोबस्ताच्या वेळी पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे “पोलीस म्हणजे दंडुकेशाही” असे नाही, “1 दिवस तुमचा 364 दिवस आमचा” असे कोणीही गृहीत धरू नये कायदा हा सर्वांना समान आहेत. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळांनी प्रयत्न करावेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत संवेदनशील ठिकाणी सक्षम अधिकारी नेमले जातील. लक्ष्मी रोड, बेलगाम चौक, अलका टॉकीज इत्यादी ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. याठिकाणी अफवा पसरून मोठी दुर्घटना व चेंगराचेंगरी होऊ शकते त्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून काम करावे. गणेशोत्सवात कोणतेही गालबोट लागू नये या करता मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. एखादी संशयास्पद किंवा बेवारस वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच जवळपास संशयित व्यक्ती जर आढळून आली तर त्याची माहिती पोलिसांना कळवावी. सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येत आहे की विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी. मिरवणुकीत मंडळी जास्त वेळ रेंगाळत न ठेवता पुढे सरकत राहील व त्याप्रमाणे इतर लोकांना मिरवणुकीच्या अनुषंगाने त्रास होणार नाही याची खबरदारी गणेश मंडळांनी घ्यावी.

गणेशोत्सवात टिळक रोडवर मार्गावरील विसर्जन मिरवणुकीचा पोलिस बंदोबस्त करत असताना एखाद्या कार्यकर्त्याला चांगले सांगण्याचा प्रयत्न केले असता मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा त्याचा वेगळा अर्थ घेतात. साहेब उलटे बोलतात का !  दम देतात का ! असा त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात. एका कार्यकर्त्या पासून दहा कार्यकर्ते जमा झाले की त्यांची गर्दी तयार होते त्यावेळी त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे. पोलिस यंत्रणेनेचा हेतू एकच असतो की विसर्जन मिरवणूक शांततेत व्यवस्थित पार पडली पाहिजे. विसर्जन मिरवणुकी मधील एखाद्या मंडळांमध्ये अनोळखी व्यक्ती नाचायला येतो त्या व्यक्तीला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गचांडी पकडून साईटला घेताना कोणती इजा झाली तर त्याचे पूर्ण गालबोट विसर्जन मिरवणुकीला लागते असे न करता त्या व्यक्तीला समजावून सांगत बाजूला घ्यावे. गल्लीबोळातील चार-पाच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या आदल्यादिवशी पहिले कोणते मंडळ जाणार, दुसरे कोणते मंडळ जाणार असे समनियोजन करावे. मंडळाने गल्लीमधील रस्ता 20 फूट किंवा 30 फूट आहे त्याचे माप घेऊन त्याप्रमाणे एक चतुर्थांश म्हणजे 10 फूट असेल तर 3 फूट मिरवणुकीच्या गाडीचा देखाव्याचे नियोजन करावे. जेणेकरून त्या ठिकाणी कोणता अनर्थ घडलातर त्या ठिकाणी अग्निशामक दल व रुग्णवाहिका येऊ शकतील याची दखल गल्लीबोळातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घ्यावी. मिरवणुकीच्या बंदोबस्तात आलेला पोलीस सकाळी 4:00 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन झाल्यावर घरी जाणार तोपर्यंत त्याला आंघोळ नाही वेळेवर जेवण नाही अशा स्थितीत तो आपले कर्तव्य बजावत असतो. असे स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमात,
सो पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पुणे शहर शिरीष देशपांडे, स्वारगेट पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, सहकारनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, भारती विद्यापीठ पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, वारजे पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, खडक पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, स्वारगेट पोलीस निरीक्षक वाहतुकीला अतुल नवगिरे व गणेश मंडळाचे 175 ते 200 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -