Home ताज्या बातम्या पुणे एरंडवणे भागात सेंट्रल मॉलसमोरील चौकात अपघातात तरुणीचा मृत्यू; एकजन गंभीर जखमी

पुणे एरंडवणे भागात सेंट्रल मॉलसमोरील चौकात अपघातात तरुणीचा मृत्यू; एकजन गंभीर जखमी

0

पुणे एरंडवणे भागात सेंट्रल मॉलसमोरील चौकात अपघातात तरुणीचा मृत्यू; एकजन गंभीर जखमी

भरधाव ट्रकने चौकातून वळताना पायी जाणाऱ्या विद्यार्थिनीस धडक दिल्याने तिचा जखमी होऊन मृत्यू झाला. या अपघातात तिच्यासोबत असलेली मैत्रीण थोडक्यात बचावली. एरंडवणे भागात सेंट्रल मॉलसमोरील चौकात शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
नेहा सुर्यकांत हंबिवंत (वय १७, रा. घोरपडी पेठ,पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी तिची मैत्रिण वैष्णवी दंडगव्हाळ (१८, रा.वारजे,पुणे) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पळून गेलेल्या ट्रकचालका विरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा हंबिवंत ही कर्वे रोडवरील गरवारे कॉलेजमध्ये इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत होती. वर्गातील मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने नेहा आणि फिर्यादी वैष्णवी या दोघी केक आणण्यासाठी गेल्या होत्या. परतत असताना नेहाच्या हातात केक होता तसेच त्या दोघी पायी चालत कॉलेजच्या दिशेने जात होत्या.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास संजीवनी हॉस्पिटलकडून वेगात आलेला ट्रक सेंट्रल मॉलसमोरील चौकातून कर्वे रस्त्यावर जाण्यासाठी डावीकडे जोरात वळाला. या वेळी ट्रक अंगावर येईल या भीतीने वैष्णवी ही पाठीमागे सरकली. मात्र, काही कळायच्या आत तिच्या पाठीमागून चालत येणाऱ्या नेहाच्या डोक्याला ट्रकचा डाव्या बाजूचा भाग जोरात धडकला आणि ती जखमी होऊन रस्त्यावर कोसळली. दरम्यान, रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाल्याने ट्रकचालक तेथून पसार झाला. जखमी नेहा ला उपस्थितांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाला. याप्ररकणी तपास सुरू आहे.