Home ताज्या बातम्या रक्तदात्याला आता आधार कार्ड सक्तीचे

रक्तदात्याला आता आधार कार्ड सक्तीचे

0

रक्तदात्याला आता आधार कार्ड सक्तीचे

रक्तदात्याला आता रक्तदानावेळी आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. रक्त संक्रमणातून होणाऱया एचआयव्हीसारख्या आजाराचा धोका वाढल्याने ओळखीचा पुरावा म्हणून रक्तदात्याने रक्तदानावेळी आधार कार्ड बरोबर आणण्याची सक्ती राज्य रक्तसंक्रमण प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे.

रक्तदान हे सर्वात पवित्र दान आहे. रुग्णाचा जीव वाचवण्यात रक्तदात्याची भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र, रक्त संक्रमणातून अनेक आजारांचा धोका वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य रक्तसंक्रमण प्राधिकरणाकडून रक्तदात्याला आधारकार्ड सोबत ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे.

रक्तदात्यांच्या सख्येत मागील पाच वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. काही लोक नियमितपणे रक्तदान करतात. रक्तपेढय़ा संकलित रक्तांची तपासणी करतात. रक्तामध्ये एचआयव्हीचे जीवाणू आढळल्यास रक्तपेढीकडून ते रक्त नष्ट करण्यात येते. याबाबतची माहिती रक्त पेढ्यांकडून इंटिग्रेटेड काऊन्सलिंग अँड टेस्टिंग सेंटरकडे म्हणजेच आयसीटीसी सेंटरकडे बहुदा पाठवली जात नव्हती. आता रक्तदात्याची माहिती रक्तपेढय़ांकडे उपलब्ध झाल्यास तपासणीत एचआयव्ही आढळल्यास आयसीटीसी सेंटर व संबंधित दात्याशी संपर्क साधून त्याला उपचाराच्या प्रक्रियेत आणता येईल, यासाठी रक्तदात्याला आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.