Home गुन्हा लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली.

पुष्पम सुर्वे (वय 22, रा. पवारनगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 38 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुष्पम याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्या अमिषातून त्याने 2018 पासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यातून पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.