Home गुन्हा फेसबुक वरून ओळख झालेल्या मैत्रीणीच्या घरावर डल्ला

फेसबुक वरून ओळख झालेल्या मैत्रीणीच्या घरावर डल्ला

0

पुणे : परवेज शेख

दि.०६/०९/२०१९ रोजी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हवीतील धवल गिरी सोसायटी,बिबवेवाडी कोंढवा रोड,पुणे
येथे दिवसा घरफोडी चोरी होवून सुमारे ३९ तोळे सोनेचे दागदागिने व ५०,०००/-रोख व चोरीतील अटीएम मधून
२५,०००/- रोख रक्कम काढून चोरीला गेलेली होती.

सदरची घरफोडी चोरी ही दिवसा झालेली असलेने व सदर घटनास्थळ पाहतां घरफोडी झालेले घराचे लॉक अथवा कडी कोयंडा तुटलेला नव्हता. तसेच प्लॅटचे दरवाजे कोणतेही प्रकारे उचकटलेले नव्हते. फिर्यादी यांचे कुटुंबातील सर्वजण बाहेर गेलेले असतांना फक्त एक ते दीड तासाचे कालावधीमध्ये सदरची चोरी झालेली होती. तसेच चावीचा वापर करुनच चोरी झालेचे प्रथम दर्शनी निष्पन्न झालेले होते. सदरचा तपासाचा धागा पकडून युनिटकडील अधिकारी व
कर्मचारी यांना मा वरिष्ठांचे आदेशान्वये प्रभारी अधिकारी दत्ता चव्हाण यांनी सुचना देवून सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यामध्ये चोरी झालेले बिल्डींगमधील कॅमेरे बंद होते. सदर सोसायटीचे मेनगेटचा कॅमेरा देखील बंद होता.


त्यामुळे तपास माहिती मिळणेस अवघड झालेले असतांना युनिटकडील अधिकारी व कर्मचारी यांनी सोसायटीतील एका
बंगल्याचे बाहेरचे सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेजवरुन सशयित इसमाची छबी प्राप्त केलेली होती. सदर छबीनुसार सदर इसमांबाबत तपास करीत असतांना स्थानिकांकडे व सोसायटीचे वॉचमन यांचेकडे चौकशी केली असता सदरचा इसम फिर्यादी यांचे पत्नीचे ओळखीचा असलेचे निष्पन्न झाले व सोसायटीत तो यापूर्वी ही एक दोन वेळा आलेची माहिती समोर आली. सदर माहितीचा धागा पकडून केलेल्या चौकशीमध्ये फिर्यादी यांची पत्नीची व सदर इसमाची फेसबुक वरुन मैत्री झालेली असलेचे निष्पन्न झाले म्हणून फेसबुकवरुन त्याची संपूर्ण उपयुक्त माहिती जमा करणेत आली. सदरच्या इसमाने
फेसबुकवरील झालेल्या मैत्रीचा फायदा घेवून आरोपी फिर्यादी यांच्या घरी दोन वेळा येवून गेलेला होता. त्यावेळी त्याने त्यांचे घराचे मुख्य दरवाज्याच्या चाव्यां चोरुन नेलेल्या होत्या. आरोपीबद्यल खात्री लायक माहिती मिळालेनंतर युनिट-५ कडील पो.उप.निरी.शेंडगे व स्टाफ त्वरीत आरोपीचे मूळ पत्त्यांवर शाहपुरी,सातारा येथे पाठविणेत आले. आरोपी वापरत असलेले मोबाईल नंबर प्राप्त करणेत आलेले होते. त्याचे आधारे त्याचे जवळचे मित्र यांना टिमने ताब्यात घेतले व
त्याआधारे आरोपी नामे:- निलेश शरद तावरे,वय २९ वर्ष,धंदा-काही नाही रा.द्वारा-शंकर देवरे,अक्षय निवास अपार्टमेंट,प्लॉट नं ३६,आर.के.शाळा नगर,शाहुपुरी गजानन मंदिरासमोर,सातारा यांस पकडणेत आलेले आहे..

सदरचा आरोपी हा पोलीस अभिलेखांवरील अटट्ल चोर असून त्याचेवर ३३ गुन्हे वेगवेगळया पोलीस
स्टेशनला व वेगवेगळयां जिल्हयांत १५ वाहन चोरीचे,०६ घरफोडी चोरी,०२ जबरी चोरी०१ दरोडयाची तयारी असे दाखल
असून त्यामध्ये त्यांस अटक झालेली आहे. तपासांमध्ये आरोपीचे ताब्यांत चोरी गेलेले मालांपैकी ३० तोळे जवळजवळ ०१
किलो चांदी,०१ चोरी केलेली मोटार सायकल,रोख रक्कम,तिन मोबाईल हॅन्डरोट असा एकूण किं.रु.११,९३,६५८/- चा
ऐवज आरोपीकडून जप्त करुन हस्तगत करणेत आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा.श्री.अशोक मोराळे साहेब,अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणे शहर मा. श्री. बच्चन सिंह साहेब,पोलीस उप-आयुक्त गुन्हे,पुणे शहर, मा.श्री.शिवाजी पवार साहेब, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-५ चे प्रभारी अधिकारी वपोनि श्री.दत्ता चव्हाण,पो.उप-निरी.सोमनाथ शेंडगे,पोलीस स्टाफ संतोष
मोहिते.महेश वाघमारे,दत्तात्रय काटम, अमजद पठाण,राजेश रणसिंग,राजभाऊ भोरडे,बडू शिंदे,प्रदीप सुर्वे,सचिन घोलप,दया शेगर,प्रमोद गायकवाड, प्रविण काळभोर यांनी ही कामगिरी केलेली आहे.