Home ताज्या बातम्या पुणे पीएमपी बसच्या दोन चाकामधील लोखंडी पट्टी तीन फूट बाहेर येऊनही बस धावत असल्याचा धक्कादायक प्रकार

पुणे पीएमपी बसच्या दोन चाकामधील लोखंडी पट्टी तीन फूट बाहेर येऊनही बस धावत असल्याचा धक्कादायक प्रकार

0

पुणे पीएमपी बसच्या दोन चाकामधील लोखंडी पट्टी तीन फूट बाहेर येऊनही बस धावत असल्याचा धक्कादायक प्रकार

सिंहगड रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसच्या दोन चाकामधील लोखंडी पट्टी तीन फूट बाहेर येऊनही बस धावत असल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रसंगी, रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी बस थांबविण्याचा प्रयत्न करुनही चालक थांबला नाही. या प्रकारात बस चालकांने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या गर्दीत (एमएच 12 सीएच 3464) या क्रमांकाच्या पीएमपी बसच्या चाकाजवळील लोखंडी पट्टी तीन फूट बाहेर आल्याने अपघाताचा प्रसंग उभा राहिला होता. यावेळी, बसच्या मागून येणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ बसचा पाठलाग करत बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक थांबण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. या प्रकाराबाबत बस चालकाची माहिती घेऊन कारवाई करण्याची मागणी, प्रवाशांनी केली आहे.