Home ताज्या बातम्या दुचाकी घसरून जखमी झालेल्या महिलेस पोलिसांच्या प्रसंगअवधाने मिळाले तात्काळ उपचार

दुचाकी घसरून जखमी झालेल्या महिलेस पोलिसांच्या प्रसंगअवधाने मिळाले तात्काळ उपचार

0

पुणे : भूषण गरुड
बिबवेवाडीत रविवारी सायंकाळी 07:45 वा. सुमारास अप्पर बसडेपो,तय्यबा मस्जिदजवळील पावसामुळे ओल्या झालेल्या तीव्र उताराच्या रस्त्यावर ऍक्टिवा दुचाकी घसरून महिलेचा अपघात झाला. तेथे पेट्रोलिंग करत असलेले बिबवेवाडी पोलिसांनी प्रसंगअवधानाचे गांभीर्य लक्षात घेत क्षणाचा विलंब न करता जखमी महिलेला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी 07:45 वा. सुमारास अप्पर बसडेपो,तय्यबा मस्जिदजवळ,बिबवेवाडी,पुणे येथे पावसामुळे ओल्या झालेल्या तीव्र उताराच्या रस्त्यावरून सुनंदा शिवराज मजगे (वय 43, राहणार. अरण्येश्वर, सहकारनगर, पुणे) ह्या घरी जात असतांना ऍक्टिवा दुचाकी घसरून अपघात होऊन जखमी झाल्या. घटनास्थळी जखमी महिलेच्या अवती-भोवती बघ्यांची गर्दी जमली होती. सीआर मोबाईल व्हॅनचे पोलीस शिपाई दत्ता केंद्रे व महिला पोलीस शिपाई ज्योती कुतवळ हे अप्पर बसडेपो येथे पेट्रोलिंग करत असतांना रस्त्यावर गर्दी जमलेली बघून तात्काळ घटनास्थळी पोहोचून बघ्यांची जमलेली गर्दी बाजूला करत प्रसंगअवधानाचे गांभीर्य लक्षात घेत क्षणाचा विलंब न करता जखमी महिलेस उपचारासाठी घेऊन जवळच असलेल्या शिफा क्लीनिकमध्ये दाखल केले. पोलीस शिपाई दत्ता केंद्र यांनी जखमी महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधून सदर घडलेल्या घटनेची माहिती दिली. तात्काळ उपचार मिळाल्याने जखमी महिलेच्या नातेवाईकांनी पुणे पोलिसांचे आभार व्यक्त करत कौतुक केले.

सामाजिक कार्यकर्ते कोमल दीक्षित यांनी सदर घटनेबद्दल सांगितले की, अप्पर बसडेपो रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ चालू असते. रोज सायंकाळी फेरीवाले भाजीविक्रेत्यांनी केलेले रोडवर अतिक्रमण, पीएमपीच्या नादुरुस्त बसेस बंद पडून व बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांचा हा नित्यक्रमच झाला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अप्पर बसडेपोचा रोड तीव्र उताराचा असल्याने थोड्याश्या पाऊसाने ओला होऊन घसरणीचा रोड होतो. त्यामुळे यारोडवर अपघात होऊन अपघातामध्ये नागरिकांना जिव गमवावा लागला आहे. परिसरातील नागरिक अपघाताच्या भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत.