Home गुन्हा वेश्याव्यवसाय करणा-या महिला व आरोपीवर पुणे पोलिसांची कारवाई

वेश्याव्यवसाय करणा-या महिला व आरोपीवर पुणे पोलिसांची कारवाई

0

पुणे : परवेज शेख

दि.०७/०९/२०१९ रोजी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे पुणे शाखेकडील पोलीस शिपाई शशांक खाडे व पोलीस शिपाई पुष्पेद्र चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ससुन हॉस्पिटल आऊटगेट समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ, पुणे स्टेशन रोड, पुणे येथे इसम नामे मयूर लोंढे हा फलटण येथुन वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत आहे. सदर बाबत पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन ससुन हॉस्पिटल आऊट गेट जवळ फुटपाथवर पुणे स्टेशन पुणे येथे १५.५५ वा अचानक छापा टाकुण आरोपी मयुर लोंढे यांनी आणलेल्या मुली वेश्याव्यवसायासाठी पिडित मुलीची पोलिसांनी सुटका केली तसेच वेश्याव्यवसायातुन सुटका करण्यात आलेल्या पिडित मुलीस संरक्षण व पुनर्वसनकामी रेस्क्यु फाऊन्डेशन हडपसर पुणे येथे रवाना केले आहे. सदर प्रकरणी आरोपी नामे मयुर दुर्योधन लोंढे वय २१ वर्षे रा मु. पशु बरड, ता फलटण जि सातारा याचे विरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३७१) अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई श्री.बच्चन सिंग पो.उप.आयुक्त गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे व पोलीस उप निरीक्षक श्री.खडके यांचेसह सामाजिक सुरक्षा विभागाकडील म.पो.हवा मोहिते, म.पो.ना. शिंदे,पो.ना.माने,पो.शि.खाडे व पो.शि. पो शि चव्हाण यांनी केलेली आहे.