Home गुन्हा खूनाचा प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने दोघांना जामीन

खूनाचा प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने दोघांना जामीन

0

खूनाचा प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने दोघांना जामीन

पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने खूनाचा प्रयत्न प्रकरणातील दोघांना न्यायालयाने डिफॉल्ट जामीन मंजुर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तेजस्विनी निराळे यांनी हा आदेश दिला आहे. वेळेत दोषारोपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे.

सुधीर ऊर्फ मॅरो तिकलकराज बिडलान (वय 20, रा. वानवडी), आणि विशाल सुरेश अडसुळ (वय 33, रा. रास्ता पेठ) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ऍड. राहुल भरेकर आणि ऍड. सुहास कोल्हे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 3 जून 2019 रोजी 9.45 च्या सुमारास पुना क्‍लबच्या प्रवेशद्वारासमोर तारापुर रस्ता येथे ही घटना घडली. या प्रकरणात आणखी एकजण न्यायालयीन कोठडीत आहे.

याबाबत मोमीन ऊर्फ मोम्या हसन शेख (वय 24, रा. ताडीवाला रस्ता) याने फिर्याद दिली आहे. शेख आणि एक 17 वर्षीएय मुलगा या घटनेत जखमी झाला होता. शेख हा एमजी रस्त्यावरून कपडे खरेदी करून घरी चालला होता. त्यावेळी तुला आमच्या इलाख्यात गांज्या वढण्यास मनाई करून सुध्दा तु परत का आलास म्हणत, फिर्यादी यांच्या डोक्‍याला कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हॉकी स्टीकने मारहाण करून फिर्यादी, त्यांच्या मित्राला जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी 90 दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याने ऍड. भरेकर आणि ऍड. कोल्हे यांनी डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला होता