Home गुन्हा महसूली अधिका-यांच्या ताब्यातून वाळू ट्रक चोरून नेणा-या गुन्हे शाखा,युनिट 04 ने केले जेरबंद

महसूली अधिका-यांच्या ताब्यातून वाळू ट्रक चोरून नेणा-या गुन्हे शाखा,युनिट 04 ने केले जेरबंद

0

पुणे : परवेज शेख

हडपसर पोलीस स्टेशन हद्दमध्ये शेवाळवाडी फाटा,हडपसर या ठिकाणी दि.०२/१०/२०१८ रोजी महसूल अधिकारी व पथक यांनी वाळू तस्करांवर कारवाई करून वाळूसह ट्रक जप्त करून ताब्यात घेतले. दि.०९/०९/२०१९ रोजी गुन्हे शाखा,युनिट-०४ चे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड व पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांना खबर मिळाली की,वरील दाखल गुन्हयातील महसूल पथकाचे ताब्यातून पळवून नेलेला ट्रक नं.MH-14 DM-0778 हा दौंड येथून वाळू घेवून पुणे शहरामध्ये वाळू विक्रीसाठी येणार आहे.सदरबाबत मा.पोलीस निरीक्षक श्री अंजुम बागवान यांनी पुणे सोलापूर रोडवर ट्रॅप लावून सदरचा ट्रक ताब्यात घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोलीस
उपनिरीक्षक विजय झंजाड,शिवराज हाळे पोलीस कर्मचारी गणेश साळूके,शितल शिंदे,सुरेंद्र साबळे,रमेश बोराटे यांनी दि.१०/०९/२०१९ रोजी रात्री ००.१५ वा.पासूनच पुणे सोलापूर रोडवर गस्त घालून ट्रॅप लावला .

पुणे सोलापूर रोड या ठिकाणी संशयित ट्रक हा पुण्याचे दिशेने येताना दिसला नमूद अधिकारी व स्टाफने त्यास थांबण्याचा इशारा दिला सदर ट्रक न थांबता वेगाने धावू लागला नमूद स्टाफने सरकारी वाहन सुमो जीपने सदर वाहनाचा पाठलाग करून त्यास लोणी काळभोर टोलनाका या ठिकाणी ०८.०० वा.सुमारास नमूद ट्रक (वाळूसह) किं.रुपये 7,50,000/- व आरोपी ट्रक चालक नामे किसन सोपान जाधव,वय-45 वर्षे,रा.मु-जाधववाडी,पो-गिरीम,ता.दौंड,जि पुणे यास जागीच पकडले

सदरची कामगिरी ही मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.अशोक मोराळे,पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री.बच्चनसिंग,मा.सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)डॉ.श्री.शिवाजी पवार,पोलीस निरीक्षक श्री.अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड,शिवराज हाळे,पोलीस कर्मचारी गणेश साळूके,शितल शिंदे,हनुमंत बोराटे,सुरेंद्र साबळे सर्व नेमणूक गुन्हे शाखा,युनिट-०४ यांचे पथकाने केलेली आहे.