Home गुन्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका इसमाला गावठी पिस्तुल व जिवंत काढतूसासह केली अटक

गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका इसमाला गावठी पिस्तुल व जिवंत काढतूसासह केली अटक

0

गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका इसमाला गावठी पिस्तुल व जिवंत काढतूसासह केली अटक

पुणे शहर लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उरळीकांचन गावात गावठी पिस्तूल घेऊन येत असल्याची बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार गुन्हेअन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून इसमाला ताब्यात घेत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूलसह एक जिवंत काढतूस हस्तगत केले.

गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगेश किशन चौधरी (राहणार. चक्रधर हाइट्स, उरळीकांचन) याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी पुसलासह एक जिवंत काढतुस हस्तगत केले. पुढील तपासणीसाठी लोणी कारभोळ पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला बातमीदाराकडून उरळीकांचन गावात एक इसम गावठी कट्टा घेऊन येत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक संदीप पाटील  गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून स्कूटर वरून आलेला इसम मंगेश किसन चौधरी राहणार चक्रधर हाइट्स डाळिंब रोड उरळीकांचन यास ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या स्कूटरच्या डिकी मध्ये एक गावठी पिस्तुलासह एक जिवंत काढतूस मिळून येत त्याच्याकडून स्कूटर्ससह एकूण 60 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासणीसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरचे कामगिरी, 
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, दत्तात्रय गिरमकर, दयानंद लीमन, सचिन गायकवाड, चंद्रकांत जाधव, धीरज जाधव, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, लिमाकतअली मुजावर, विजय कांचन यांच्या पथकाने केली.