नगरसेवक अॅड.हाजी अ. गफूर पठाण यांच्या विकास निधीतून करण्यात येणाऱ्या विविध कामांचा भूमिपूजन समारंभ मा.खा.वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडला

- Advertisement -

पुणे : परवेज शेख
प्रभाग क्र.२७ कोंढवा खुर्द-मिठानगर मध्ये पुणे महानगर पालिका चे नगरसेवक अॅड.हाजी अ. गफूर पठाण यांच्या विकास निधीतून करण्यात येणाऱ्या विविध कामांचा भूमिपूजन समारंभ मा.खा.वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडला. या वेळी मा.खा.वंदनाताई चव्हाण यांच्या खासदार निधीतुन उभारण्यात येणाऱ्या हजरत मौलाना कलंदर साहब(रहै) अभ्यासिका व वाचनालयाचे भूमिपूजन करण्यात आले.तसेचा मा.पठाण यांच्या निधीतून हजरत टिपू सुलतान(रहै) क्रीडांगणात विविधविकास कामे करणे, माता रमाबाई आंबेडकर महिला प्रशिक्षण व उद्योग केंद्र व ओटा मार्केट चे भूमिपूजन करण्यात आले.

मा.खा.वंदनाताई चव्हाण यांनी आपल्या भाषणात देशाचा आत्मा सर्व धर्म समभाव असून या आत्म्यालाच धोका निर्माण झाला असून देशात धर्माच्या नावाखाली होत असलेल्या घटनांमुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांना यावर मात करणे आवश्यक असून देश हितासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.या वेळी नगरसेवक अॅड.अब्दुल गफूर अहमद पठाण यांनी कोंढवा प्रभागात होत असलेल्या विकास कामांची माहिती देऊन नागरिकांनी होत असलेल्या विकास कामांबाबत सूचना केल्यास नक्की स्वागत करू असे सांगितले.


या वेळी कार्यक्रम मध्ये मा.खा.वंदनाताई चव्हाण, मा.चेतन तुपे(अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)माजी महापौर प्रशांत जगताप,क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष रत्नप्रभा जगताप,हडपसर विधानसभा अध्यक्ष नारायण लोणकर, नगरसेविका मा.नंदाताई लोणकर,नगरसेविका परवीन फिरोज शेख,हसीना इनामदार,मा.नगरसेवक रईस सुंडके,अनिस सुंडके,मा.शालिनी पाटील,लोणकरताई,मा.मनाली भिलारे,आस्मा शेख,मौलाना अब्दुल रशिद,मौलाना समद,मौलाना मन्सूर, मौलाना सलीम,मौलाना फरीद पठाण, बापू मुलाणी,नूर शेख,इम्तियाज शेख,मेहबूब शेख,सरवर शेख,कदीर शेख,अब्दुल बागवान,आसिफ पटेल,हुसेन पाशापुरी,शकुर सय्यद, सिकंदर पठाण,हनीफ शेख,आबिद शेख,यामिन अन्सारी,जाहिद शेख,फय्याज मोमीन,इम्मा भाई,राजू शेख,रऊफ शेख, मोहसीन शेख,अख्तर पिरजादे,देशपांडे साहेब,जोति पाटील,समीर शेख,आरिफ शेख, कत्तल शेख, इम्तियाझ (मामू) शेख,शाहरुख बागवानव स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


- Advertisement -