आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.
रियाध: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या अराम्कोच्या सौदी अरेबियातील दोन फॅसिलिटी सेंटर्सवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. ड्रोन हल्ल्यानंतर या दोन्ही फॅसिलिटी सेंटर्समध्ये आग लागल्याची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली.
येमेनमधील हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबादारी स्वीकाराली आहे. अबकेक आणि खुराइस येथील फॅसिलीटी सेंटर्सवर हा ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्याला औद्योगिक सुरक्षा दलाच्या सैनिकांनी गोळीबाराचे प्रत्युत्तर दिल्याचे सौदी अरेबियाकडून सांगण्यात आले.
गेल्याच महिन्यात अराम्कोच्या नॅचरल गॅसच्या फॅसिलिटी सेंटरवर हल्ला झाला होता. यात जीवितहानी झाली नव्हती. तत्पूर्वी गेल्या काही महिन्यांमध्ये क्रॉस-बॉर्डर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने सौदी अरेबियाच्या हवाई तळावरही हल्ले झाले होते. त्यामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.