अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
- Advertisement -




मुंबई दि. 24:- राज्यातील अल्पसंख्याक घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

आज अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपसचिव मिलींद शेणॉय, जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत प्राप्त प्रस्तावांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेंतर्गत प्राप्त प्रशिक्षण संस्थाचे प्रस्तावांची छाननी करून शासनास सादर करणे. (मुंबई, ठाणे, पुणे, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक व अमरावती) निवासी पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थाच्या प्रस्तावांची छाननी करून शासनास सादर करणे, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK), शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थीनी  यांच्या आहाराकरिता थेट रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करणे अशा विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

000

सागरकुमार कांबळे/वि.सं.अ/







- Advertisement -